सदिच्छा ग्रेट भेट: प्रा. डी. आर.सोनकांबळे सर..
(सेवा निवृत्त प्राध्यापक: बळीराजा महाविद्यालय,ता.पालम जिल्हा: परभणी.)
आज नांदेड येथें शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातल्या एका संघटनेच्या बैठकीच्या निमित्ताने , प्रगतीताईच्या आग्रहस्तव बामसेफच्या कार्यकारिणीतील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साथी आणि मार्गदर्शक प्रा.डी.आर सोनकांबळे सरांची त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ भेट झाली..
ह्या भेटीत चळवळीच्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यमान सर्वच सामाजिक संघटनांची दशा आणि दिशा ह्यांवर आपल्याशी मुक्त संवाद साधताना आपलं अभ्यास चिंतनातून एक सुंदर विश्लेषण माझ्या सारख्या बुद्धिजीविला एक नवी दिशा देऊन गेलं..
आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत आपण एक विद्यार्थी प्रिय शिक्षक ते प्राध्यापक, प्राचार्य पासून ते सामाजिक चळवळीतील एक अभ्यासू वक्ता म्हणून आपली ख्याती परभणी जिल्ह्यात सर्वदूर प्रसिद्ध आहे..ह्याचा आम्हांस सार्थ अभिमानचं..
अगणित विद्यार्थी आणि सामाजिक चळवळीत कार्य करणारे असंख्य कार्यकर्ते घडविण्यासाठी आजही आपली तीच धडपड,अविरत कष्ट आणि प्रामाणिकतेला सलाम..
प्रगती ताईच्या निमित्ताने आपली भेट आणि मार्गदर्शन माझ्यासाठी एक पर्वणीच..!
मा. कांशीरामजी साहेबांच्या सहवासात त्यांच्या वैचारिक शिदोरीच्या जडणघडणीत घडलेलं आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व माझ्यासारख्या तमाम युवकांना नेहमीच प्रेरणादायी असेल हयात शंकाच नाही..
आपल्या भेटीत मनसोक्त वैचारिक मंथन आणि काकूंनी , क्रांतीताई तसेच प्रगतीताईनी स्नेह भोजनाचा दिलेला आस्वाद नेहमीच संसमरणीय राहील सर..
आपणास दीर्घायुष्य लाभो हीच कामना...!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर..
आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक आणि साथी:
विद्यार्थी मित्र प्रा.रफीक शेख,
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment