आरंभ इन्स्टिट्यूट ऑफ NEET & JEE आणि प्रेरणा फाउंडेशन,वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात विद्यार्थी आणि पालकांसाठी सस्नेह मार्गदर्शन आणि व्यक्तींमत्व विकासाचा कार्यक्रम काल दिनांक 12 एप्रिल 2022 रोजी आंजी-मोठी येथें अत्यंत उत्साहात पार पडला..
ह्या कार्यक्रमात मुख्य अतिथी मार्गदर्शक म्हणून मा. श्री. गणेश शिंदे ( सुप्रसिद्ध, युवा व्याख्याते पुणे) आणि विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख ( डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी) यांची उपस्थिती होती..
आपल्या मार्गदर्शन संवादात श्री. गणेश शिंदे सरांनी, आजच्या काळात मुलांच्या करीअर बाबतीत पालक-शिक्षकांच्या महत्वाच्या भूमिकेला अधोरेखित करीत, ध्येय निवडताना पारंपरिक वाटेने चलण्यापेक्षा उच्च-उदात्त प्रेरणेने प्रेरित होऊनचं कौटुंबिक संस्काराचा आदर्श मनात घेवूनचं व्यापक विचारांचा व्यवसाय निवडावा आणि त्याला समाजहित जोपासावें हे सांगताना आयुष्यात दोनच गोष्टींचं कमवा एक यश आणि दुसरा आनंद.. तो देता कसं येईल ह्यासाठी आपली प्रमाणिक धडपड आणि कठोर परिश्रम असावे..
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख सरांनी आजच्या काळातील तंत्रस्नेही स्मार्ट ध्येय कसं आहे, त्याची निवड कशी करावी, पालक-शिक्षकांची महत्वाची भूमिका, मोबाईलची व्यसनाधीनता,मुलांचं वागणं-बोलणं, शिक्षण घेतांना असलेली प्रामाणिकता, अमर्याद संध्या असलेल्या ह्या जगात स्वत:ला ओळखून , स्वतःची सिद्धता , स्वयं-कर्तृत्व नेतृत्वात सिद्ध करतांना समाज भान ठेवत त्याला दिलेला समाजिकतेचा गंध , आयुष्यभर न थकता शिकत जाण्याची वृत्ती म्हणजे आजन्म विद्यार्थीचं राहून व्यापकतेनें ह्या समाजाकडे कसं पाहावं आणि त्याला पुन्हां काय आणि कसं द्यावं..ई.. आदी संदर्भात हसत खेळत पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला..
ह्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला..
कार्यक्रमाचं संयोजन आरंभ इन्स्टिट्यूटची संचालक टीम प्रा. विशाल उराडे,प्रा. विवेक लोहकरे,प्रा. रविकांत गायकवाड, प्रा. नितीन वरूटकर, प्रा.राहुल जाधव सह मा.सौ. जयश्रीताई सुनील भाऊ गफाट (माजी शिक्षण सभापती, जि. प.वर्धा) आणि प्रेरणा फाउंडेशन यांच्या सहकार्याने पार पडला..
Post a Comment