नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीच्या प्रमाणाबद्दल चिंता व ती कमी व्हावी अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
खरे तर शाळा आकर्षक व्हाव्यात, शिक्षण आनंददायी व्हावे म्हणून काय काय करता येईल, यावर पुष्कळ संशोधन फार पूर्वीपासूनच चालू आहे. अध्यापक प्रशिक्षणेही जोरात चालू आहेत. विद्यार्थ्यांनी शाळेत शिकणे सोडून देऊ नये म्हणून परीक्षा सोपी करणे अथवा परीक्षाच न घेणे, परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष ढिले करणे असलेसुद्धा अनेक उपाय करून झाले; पण विद्यार्थ्यांची गळती काही कमी होताना दिसत नाही. विद्यार्थी शाळेत आनंदाने जात आहेत, असे " दिसत नाही.
म्हणूनच प्रचलित शिक्षणपद्धतीचा मुळातून सांगितले की हाच आपला यावर्षीचा अभ्यासक्रम!
विचार करायला हवा...
कुतूहल हे शिक्षणाचे मूळ प्रेरणास्थान आहे. कुतूहल वाटले, प्रश्न पडला तर मनुष्य स्वतःला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो, धडपडतो. त्यासाठी दिवसरात्र एक करतो. पण मग असं शाळेत का मडत नाही? माणसाला प्रश्न पडणे, कुतूहल वाटणे अगदी नैसर्गिक आहे. लहान मुले सतत प्रश्न विचारत असतात. असे असतानादेखील मूल शाळेत जायला नको का म्हणते ? या प्रश्नाला भिडायला हवे.
प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्याथ्यापेक्षा माध्यमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा उत्साह कमी झालेला आपल्याला दिसतो. हा नैसर्गिक उत्साह टिकविण्यासाठी शाळेमध्ये अशी काही व्यवस्था करता येईल का? शाळेत ठराविक साचेबद्ध अभ्यासक्रम जबरदस्तीने शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना त्यांना स्वतःला पडलेल्या प्रश्नांना उत्तरे मिळतील, असे काही करता येईल का ? तर कदाचित विद्यार्थी उत्साहानं शाळेत येतील. वर्गात त्यांना मजा येईल, असे वाटून भौतिकशास्त्र विषयासाठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांवर एक प्रयोग केला.
त्यांना विचारले की तुम्हाला स्वतःला कोणते प्रश्न पडलेत, ते एका कागदावर लिहून काढा. विद्यार्थ्यांनी त्यांना पडलेले प्रश्न सांगताक्षणी भराभर लिहून काढले. काही गमतीशीर तर काही साधे सरळ, काही नेहमीचे विचारले जाणारे, तर काही अगदीच वेगळे, असे सर्व प्रकारचे प्रश्न त्यामध्ये आले. आणखी चांगले प्रश्न काढण्यासाठी एक आठवडयाचा वेळ दिला. मग आलेल्या सगळ्या प्रश्नांचे वर्गीकरण करून प्रश्नांचे गट बनवले.
काही विद्युतसंबंधी होते तर काही यांत्रिकी संदर्भात काही प्रकाशासंदर्भात होते तर काही ध्वनी संदर्भात. या निवडलेल्या प्रश्नांच्या समोर प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावही लिहिले त्याच्या प्रती काढल्या, वाटल्या आणि विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी आपण तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भौतिकशास्त्र शिकणार आहोत. विद्याच्यासाठी हा सुखद धक्का होता.
खरोखरीच याप्रकारे संपूर्ण वर्षभर तासिका झाल्या. तासिका अतिशय उत्साहात व आनंदात पार पडल्या, याचे कारण विद्यार्थी, इतर प्रौढ तज्ज्ञांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शिकत नव्हते, तर त्यांना स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळत होती. विद्यार्थ्यांनीच काढलेले प्रश्न असल्याने सर्वसाधारणपणे सर्वांनाच ते प्रश्न पडलेले होते. त्यामुळे कुतूहल जागे होते.
ज्ञानरचनावादाच्या उपयोगाचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण कोणते असेल? मुले वर्षभर आनंदाने शिकली, प्रयोगही केले. तक्रार केली ती पालकांनी..!
'सर, अभ्यासक्रमाचे कसे होणार..?
अशाने नंतर पुढे जाऊन इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मार्क कमी मिळाले तर? पठडीपेक्षा वेगळे केले की, हजार शंका निर्माण होतातच. पण मला त्याची काळजी नव्हती, याचे कारण या वेगळ्या स्वरूपात विद्यार्थी इयत्ता आठवीचाच अभ्यासक्रम शिकत होते, याची मला खात्री होती.
एवढेच नव्हे तर त्यांचे शिकणे अधिक परिणामकारक झाले होते.
-लेख संकलन आणि संपादन:
विद्यार्थी मित्र प्रा. रफीक शेख
Post a Comment