" शिंपल्यासारखी खूप कमी लोक असतात या जगात,ते दुसऱ्यांना मोत्या सारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ बघत नाहीत..!! "
आमचे स्नेही मित्र आदरणीय प्रा. मोईन शेख ( बेलेश्वर ईन्सिट्युट ऑफ हेल्थ सायंस चे प्रोग्राम को-ऑरडिनेटर ) सरांचे बंधू डॉ. मो.निजामोद्दीन शेख (मदनी) { B.H.M.S.-M.D (M.U.H.S Nashik) } यांच्या होमिओपॅथी दवाखान्याचं दिनांक 6 मे 2022 रोजी , शालिमार फंक्शन हॉल, रहेमत नगर परभणी येथें , सुशीलकुमारभैय्या सुरेशदादा देशमुख यांच्या हस्ते भव्य उद्घाटन कार्यक्रम आणि समारंभ अत्यंत उत्साहात पार पडले.
आमचे काका मो. कलीमोद्दीन शेख ( सेवा-निवृत्त,DM,पाटबंधारे विभाग महाराष्ट्र राज्य ) यांच्या शिस्तबद्ध शिक्षण-संस्कारात लहानांचे मोठे झालेले त्यांचे दोन्हीं सुपूत्र , आजच्या काळात आपली सामाजिक बांधिलकी जपत आपल्या व्यवसायिक आयुष्यात काकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत एक मुलगा शिक्षण क्षेत्रात तर दुसरा आरोग्याच्या क्षेत्रात आपली नेत्रदीपक कामगिरी करत असल्याचा आम्हांस सार्थ अभिमान वाटतो..
डॉक्टरी व्यवसायिक सेवा क्षेत्रात मोक्याच्या ठिकाणी आपली क्लिनिक थाटून अमाप पैसा कमविण्यापेक्षा आपल्याचं परिसरात गोरगरीब , मोलमजुरी करून खाणाऱ्या कष्टकऱ्यांच्या सेवेत आपली सेवा देण्याचं कार्य हे काकांच्या प्रेरणेने शक्य झालं..
सामाजिक सौहार्द, सदभावना आणि विश्व-बंधुत्वाचं प्रतीक असलेल्या ईद निमित्त दावते-ए-शेरखुमाच्या आयोजनाने ह्या कार्यक्रमाची रंगत वाढली..
क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी मोईन मौली , सय्यद खादर भाऊ,बाबा पटेल काका आणि परिसरातील प्रतिष्ठित आणि जेष्ठ नागरिक ह्या सर्वांनी ह्या क्लिनिकला हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या..
ह्या कार्यक्रमाचं नियोजन मोईन सरांनी केलं आणि सूत्र-संचलन मला देऊन उपकृत केलं त्याबद्दल हार्दिक आभार..
आपल्या ह्या सामाजिक सेवावृत्त संकल्पनेला आमच्या कडून अनेक शुभेच्छा आणि सदिच्छा..🌺🌹
🙏🏻 आपलाच स्नेहाकिंत शुभेच्छुक:
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com/?m=1
Post a Comment