जेव्हा मुस्लिम समाज अशी ज्ञानाची जोपासना करू लागेल,
तेव्हाच आपण प्रगतीपथावर नक्कीच असू.. 👍🏻
मराठी मुस्लिमानी धर्मांधता आणि मिथ्य अभिमानाच्या अस्मितेच्या पलीकडे जाऊन ज्ञानउपासना करून भारतीय संविधानाप्रती आपली कर्तव्य कटीबद्धता सिद्ध करीत.. आपल्या न्याय-हक्कांसाठी लढा उभारणं गरजेचं आहे मित्रांनो, त्याशिवाय मुस्लिमांचं सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतीक विकास अशक्य आहे असं मला वाटतं..
मागील सात दशकांत 'अल्प-संख्याक' विशेषणाच्या आणि राजकीय मताच्या वोट-बँकच्या पलीकडे सत्ताधाऱ्यांनीं मुस्लिम समाजाला दिलंय काय?
स्वातंत्र्यांनंतर समाजाचं प्रचंड नुकसान धार्मिक आणि राजकीय कूचकामीं नेतृत्वानं केलंय ही दीर्घ शोकांतिकेची पिढा आजच्या अनेक पिढ्यानं पिढ्या भोगत आहेत..दिवसेंदिवस धार्मिक ध्रुवीकरणाचं बळी पडत हाच अल्प-संख्याक समाज असुरक्षित होतं चाललंय, आमच्या लेकराबाळाचं सामाजिक-आर्थिक भविष्य आणि करिअर धोक्यात घालणारं आजचं 'मिंध' नेतृत्व किती संवेदनशील आणि सजगतेसह सक्षम आहे.?
संविधानिक हक्कांच्या बाबतीत आजही मुस्लिम समाज जागरूक नाहीये..
मराठा आरक्षणासोबत मुस्लिमांनाही आरक्षण हवयं..? पण कोणतं? ह्याचं आकलन ना इथल्या नेतृत्व ठेकेदारांना आहे ना धार्मिक गुत्ते घेत फितने आणि फतव्यांचें तोंडी रबरी शिक्के 'प्रबोधन' विचार मांडणाऱ्यांना पुढं असणाऱ्यांना दिन-सोबत दुनियादारींतही आपल्या व्यक्तीगत मोक्ष पेक्षा सामाजिक मोक्षाकडेही आपली धार्मिक आज्ञा आहे हे विसरलेला समाज-नेतृत्व आजही आधुनिक तंत्र-स्नेहीं ज्ञानाची कास धरत स्वतःला अद्यवयत करायला कधी तयार होईल..?
वेळ, परिस्थिती अनुकूलता आणि सामाजिक गरज ही बाब लक्षात घेता मुस्लिम समाजाला आजच्या काळात शिक्षण, स्वंरक्षण आणि आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे.. पण हे लक्षात येण्या-पूर्वी समाजानं आपलं धार्मिक आणि सामाजिक 'आत्मपरीक्षण' ही करणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
'ईक्रा' सोबतचं दिनचं अंमल आपल्या दुनियादारितून सामाजिक संवेदनशीलतेचं सामाजिक भानही नेतृत्वानें प्रकट केलं तर.. आजही ज्ञान-क्रांतीतुन सामाजिक सुधारणा शक्य होईल असं मला वाटतं..
पैगंबरांनी 'सामाजिक' सुधारणानेंचं प्रस्थापीत केलेलं भौतिकवादी प्रगतिचा आदर्श 'अरब' जगतातल्या अनेक देशाचा आज भौगोलिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक आणि अत्याधुनिक विकास हा 'ज्ञान-क्रांती' तुनचं (ईक्रा) शक्य झालेला असताना भारतीय मुस्लिम मागे का?
प्रचंड दैववादी समाज, धार्मिक भावनेच्या अस्मितेला बळी पडलेला, ज्ञान-विज्ञानांतुन आपलं विवेक विकसित करण्यासाठी 'प्रबोधन विचार ' स्वीकार करण्याचं धाडस करेल का?
क्रमश:
एक सामाजिक कार्यकर्ता
प्रा. रफीक शेख, परभणी.
@मुस्लिम_प्रबोधन_मंच
Post a Comment