उपेक्षितांचा आवाज ठरलेल्या जॉन फॉस यांचा गौरव..
हतबलता, भीती, नैराश्य मांडले सोप्या शब्दांत मिळाले नोबेल..
उपेक्षितांचा आवाज ठरलेली नावीन्यपूर्ण नाटके आणि गद्यासाठी यंदाचे साहित्यातील नोबेल पारितोषिक नॉर्वेचे लेखक जॉन फॉस यांना जाहीर करण्यात आले आहे. स्वीडीश ऑस्कर अकादमीचे स्थायी सचिव मॅट्स माल्म यांनी स्टॉकहोममध्ये घोषणा केली...
जॉन फॉस यांनी स्वत:ची लेखन पद्धती विकसित केली, जिला 'फॉस 'मिनिमालिजम' म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर त्यांची दुसरी कादंबरी स्टैंग्ड गिटार मध्ये दिसून येते. फॉस यांच्या लिखाणात दैनंदिन जीवनात होणाऱ्या घटनांचे चित्रण करण्यात आले आहे..
मानवी भावना अगदी सोप्या शब्दांत..🌹
फॉस यांच्या लिखाणातून मजबूत भाषिक आणि स्थानिक संबंध दिसून येतात. हतबलता, भीती, नैराश्य अशा शक्तिशाली मानवी भावना अगदी सोप्या शब्दांमध्ये मांडण्याचे कौशल्य फॉस यांच्या लिखाणात दिसून येते, असे मत निवड समितीतील सदस्यांनी व्यक्त केले.
नाटक, कादंबरीपासून बालसाहित्यापर्यंत अशी बहुमुखी प्रतिभा असलेल्या फॉस यांना नॉर्डिक साहित्यातील दिग्गज लेखक मानले जाते.
समाजात वावरताना आपल्या सह-संवदेनशील अनुभूतीनं मानवी व्यथा आणि वेदना प्रकट सोप्या शब्दात मांडताना, उपेक्षितांचा आवाज बनवून मानवी मूल्यांचा पुरस्कार आपल्या साहित्यांतुन जगासमोर मांडताना 'नोबेल' फाउंडेशनें त्याला जागतिक किर्तीचा पुरस्कार द्यावं हे गौरवांकित आहे..
भारतीय लेखकांतहीं हीं धमक गुरुदेव रविंद्रनाथ टागोरच्या ' गीतांजली' नंतर आली नाहीं हे दुर्दैव कदाचित..
स्थानिक साहित्यिक कलाकृतीहीं आपल्या मार्मिक आणि समाजभीमुखतेने अजरामर होऊ शकेल असं लेखन आपल्याकडे होणं गरजेचे आहे..
स्टिव्ह पिंकर च्या Enlightenment Now: The Case for Reason, Science, Humanism, and Progress च्या नंतर जॉन फॉसचं साहित्य आपलं लक्ष वेधून घेतो..
तूर्तास...
जॉन फॉसचं अभिनंदन... 🌹🌹
- एक साहित्यप्रेमी
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख.
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment