' माणुसकीला काळिमा..!'
भारतीय समाज नैतिक अध:पतनाकडे?
आजच्या दैनिक लोकमत, दैनिक सकाळ आणि दैनिक लोकसत्ता ह्या आघाडीच्या सर्वच वर्तमानपत्रातील शालेय, महाविद्यालयिन मुलींवर आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आणि छेडछाडीच्या राज्याच्या कानाकोपऱ्यांतील बातम्या वाचल्या आणि मन अगदी सुन्न आणि अस्वस्थ झालंय..
कोलकत्ता आणि मुंबई परिसरातील बदलापूर येथील घडलेल्या निंदनीय घटनेच्या निमित्ताने देशात 'निर्भया' प्रकरणानंतर कुठं नं कुठं मुली आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या बातम्या वर्तमानपत्रात नेहमीच येतात पण यंदा ह्या घटनांचीं तीव्रता वाढलेली असून, भारतीय समाजाच्या सामाजिक आणि मानसिक नैतिकतेवर अंतराष्ट्रीय पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय हे खूप खेदजनक आणि लांच्छनास्पद आहे मित्रांनो..
दिवसेंदिवस नैतिक अध:पतन झालेल्या समाजात आपल्या मुली आणि महिला खरंच सुरक्षित आहेत का?
शाळा आणि अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये मुला- मुलांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी शालेय सुरक्षा आणि संरक्षणा संबंधी 'पॉक्सो'नुरुप विकसित केलेल्या 2021 च्या मार्गदर्शक तत्त्वांची सर्व राज्ये आणि - केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या शाळांमध्ये अंमलात आणावे, असे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने वेळोवेळी संबंधितांना देऊनहीं..
सामाजिक स्तरांवर एक भारतीय नागरिक म्हणून आपणा सर्वाचें कर्तव्य आपण विसरलोय का?
कडक कायद्यापेक्षा आजच्या स्वैराचारात शालेय, महाविद्यालयिन आणि कौटुंबिक स्तरांवर 'लैंगिक' शिक्षणाच्या जाणीव-जागृतीनें ह्या घटनांवर मात करता येऊ शकते असं मला वाटतं..
विविधतेतील एकता साधत भारतीय समाज आपल्या सामाजिक प्रश्नाच्या जटील सोडवणुकीत मात्र दिवसेंदिवस नैतिक अध:पतनाकडे का जातोय हा प्रश्न मात्र अस्वस्थ करून सोडतोय..
काय वाटतं आपणास मित्रांनो.. ह्या प्रश्नावर आपलं मत..?
क्रमश :
सौजन्य आणि साभार : दैनिक लोकमत, लोकसत्ता आणि सकाळ
( दिनांक 24 ऑगस्ट, 2024 आवृत्ती )
एक संविधान प्रेमी आणि संवेदनशील भारतीय
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन परभणी.
Post a Comment