🎓 सदिच्छा भेट : The Excellence Career Academy, Chatrapati Sambhaji Nagar
( Aurangabad )
प्रा. मनोज जाधव..!
( माजी विद्यार्थी : वर्ग 12 वी शैक्षणिक वर्ष 2010-2011 बॅच )
डॉ.ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन ह्या शैक्षणिक परिवारातील आदर्श आणि गुणवंत माजी विद्यार्थी.. सध्या स्थितीत गेल्या पाच तें सहा वर्षांपासून छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) येथे The Excellence Career Academy च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी कोचिंग घेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नांना यशाचा सुगंध देणाऱ्या The Excellence Career Academy मधून आजपर्यँत शेकडो विद्यार्थी शासकीय सेवेत गेले आहेत,प्रा. मनोज जाधव यांची प्रामाणिक धडपड, अथक प्रयत्न, अध्ययन आणि अध्यापनावर अत्यंत कमी वेळेत मिळवलेलं कौशल्य, सतत नवं काही शिकण्याचीं अंत:प्रेरणा, विद्यार्थी स्नेहीं कर्तृत्व, स्वतःवरील गाढ विश्वास, स्पर्धा परीक्षा क्षेत्रात मिळवलेलं घवंघवीत यश... नक्कीच येणाऱ्या काळात आपलं भावी भविष्य उज्ज्वल करणारं आहे..
आम्हांस आपला सार्थ अभिमान विद्यार्थी मित्रा..!
आज छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) येथील मिलिंद महाविद्यालयात एका परिसंवादाच्या निमित्ताने.. प्रा. मनोज जाधव यांच्या अकॅडमीला सदिच्छा भेट देण्याचा योग आला..
त्यांनी केलेलं यथोचित आदरतिथ्य खूपचं भावलं..!
आपल्या कार्यास लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा विद्यार्थी मित्रा..!
आपलाच स्नेही आणि मार्गदर्शक..
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment