"ग्रामीण जीवन हे सोपे असते, पण त्यातील संघर्ष मात्र गुंतागुंतीचे असतात."
- रा. रं . बोराडे सर
ग्रामीण साहित्यातील महत्त्वाचे नाव, पाचोळाकार रा. रं. बोराडे सर यांचे आज पहाटे निधन झाले आणि मन अगदी सुन्न झालं.. 😥
शालेय शिक्षणात सरांच्या साहित्याचा आणि महाविद्यालयिन आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठात पदव्यूतर शिक्षणात सरांचा सहवास लाभला होता..
गेली 20 वर्ष, फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्याशी वैचारिक असलेलं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं...
मराठी साहित्य विश्वातील त्यांचं ग्रामीण साहित्यातील भाषा शैली, मनवेधक शब्द, मराठवाड्याच्या मातीचा शब्द-गंध, सर्वधर्म समभाव, सहिष्णूता, सार्वजनिक जीवनातील सोज्वळ विनम्रता,मराठी साहित्यातील एक मान्यवर लेखक, समीक्षक, आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असताना त्यांनी ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव, आणि मानवी भावभावना यांचे उत्कृष्ट चित्रण आपल्या लेखनातून केले, त्यांच्या साहित्यिक शैलीत ग्रामीण भागातील साधेपणा, भाषेतील सहजता, आणि सामाजिक प्रश्नांची जाणिव प्रकर्षाने दिसते.
मला रा. र. बोराडे सरांची गाजलेली "पाचोळा" ही त्यांच्या लेखनातील एक महत्त्वाची कादंबरी मला खूप भावली..या कादंबरीत सरांनी ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनाचे वास्तववादी चित्रण केले आहे.तुमच्या कथा आणि कादंबऱ्यांमध्ये समाजातील विविध स्तरांतील संघर्ष, विषमता, आणि मानवी भावभावना यांचा प्रभावी पद्धतीने उलगडा केलेला असतो तो माझ्या सारख्या एका संवेदनशील मनाला लगेच भेदतो..
आपण ग्रामीण साहित्य चळवळीला दिलेलं बळ आणि असंख्य नवोदित लेखकांना लिहण्यासाठी दिलेलं प्रोत्साहन हे अधोरेखित आहे..
आपली प्रथम भेट ही सन 2007 ला औरंगाबादला मराठावाडा साहित्य परिषदेच्या एका पुस्तक प्रदर्शन आणि सोहळ्यात झाली होती..आपण दिलेल्या मुक्त वेळात झालेल्या वैचारिक गप्पांत..आपल्या कडून खूप काही शिकलो आणि मराठी साहित्याच्या प्रेमात आजतायगत वावरतोय आहे..
आज सकाळीचं एका ग्रुपवर पडलेल्या पोस्टनं अचानक धक्का बसला मित्रांनो.. 😥
आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण लिहते राहिलात..!✍️
आपल्या कार्यास सलाम सर 🙏
आदरणीय सरांना भावपूर्ण आदरांजली...🙏
- आपलाच एक साहित्यिक चाहता आणि विद्यार्थी
-एक पुस्तकप्रेमी आणि समीक्षक :
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment