#राष्ट्रीय_विज्ञान_दिनाच्या_निमित्ताने.. ✍️
समूळ उच्चाटन करून टाकावं,
अंधश्रद्धांच्या जळमटांचं,
ज्ञानाच्या दीपाने जग उजळावं,
शोध सत्याचा लावून!
धूसर निळ्या-टिंब ग्रहात जगावं,
सीमा, भाषा, भेद विसरावं,
मानवी अस्तित्वाच्या खुणांचा दाखला देवून,
बंधुत्वाचं नवं विश्व उभारावं!
विज्ञानाच्या शोधांना गती द्यावी,
तथ्यांच्या प्रकाशात वाट चालावी,
चिकित्सेच्या कसोटीवर सत्य शोधून,
मानवी बुद्धीला धार द्यावी!
सोड सगळे ग्रह, इथेच निर्माण कर,
समतेच्या मूल्यांना नव्याने जप,
लिह मानवा, आशेची नवी कविता,
मानवतावादाचा दाखला ठेव!
शोध चालू आहे निरंतर असेल... ✍️
राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा !🌹
नोबेल विजेते वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांनी आजच्या दिवशी रमण परिणामाचा शोध लावला, भारतात हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाधिष्ठीत समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प राष्ट्रीय विज्ञान दिनी करूया.
#NationalScienceDay #राष्ट्रीय_विज्ञान_दिन
-संपादीत काव्य..✍️
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment