🎓 Artificial Intelligence (AI)
(AI Chat Bot, ChatGPT, Deepseek, Groak, SMART AI)
आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिकणं ही केवळ गरज नाही, तर काळाची मागणी आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतलं नाही, तर मागे पडण्याचा धोका वाढतो.
AI हे केवळ एक तंत्रज्ञान नसून, ते प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवत आहे. व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, आर्थिक व्यवहार अशा विविध क्षेत्रांमध्ये AI चा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तंत्रज्ञान समजून घेणं आणि त्याचा योग्य वापर करणं अनिवार्य ठरतं.
आज इंटरनेटवर, विशेषतः YouTube वर, AI संदर्भात विपुल माहिती उपलब्ध आहे. मात्र, योग्य दिशादर्शन आणि नेमकी सुरुवात कुठून करावी, हा मोठा प्रश्न असतो. हाच विचार करून, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने Infosys या दिग्गज IT कंपनीच्या संलग्न ई-लर्निंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने 80-120 तासांचा प्रॅक्टिकल ओरिएंटेड AI कोर्स नुकताच पूर्ण केला आहे.
AI चा प्रभावी उपयोग करण्यासाठी Prompt Engineering हा एक महत्त्वाचा कौशल्याचा भाग आहे. योग्य प्रॉम्प्ट दिल्यास अवघ्या काही सेकंदांत अचूक आणि उपयुक्त माहिती मिळवता येते.
हा कोर्स शिकताना बौद्धिक संपदे संदर्भातही खूप काही शिकता आलं मित्रांनो..येणाऱ्या काळात ह्यावर कार्य करण्याचीं तीव्र इच्छा आहे..
नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची जिद्दच माणसाला भविष्याच्या संधींसाठी तयार करत असते. म्हणूनच, सतत शिकत राहा, अपडेट राहा, आणि स्वतःला अधिक सक्षम बनवा..!
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment