जगाच्या गर्दीत, हजारो चेहऱ्यांच्या कोलाहलात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते..आपल्या अस्तित्वाची किंमत दुसरा कोणी ठरवत नाही,तर ती आपण ठरवतो, ती आपण घडवतो, आणि हो ती आपण लढून कमावतो.
“स्वतःसाठी लढणारा माणूसच खरी दुनिया जिंकतो.”
हे वाक्य ऐकताना साधं वाटेल, पण यामागे काळाचा गहिरा अनुभव आणि संघर्षाची सगळी कहाणी दडलेली आहे.
लढाईची सुरुवात आतूनच होते..
लढाई नेहमी तलवारीने होत नाही; कधी ती मनाच्या किल्ल्यात उभी राहते. कुणीतरी साथ देईल, हात धरून पुढे नेईल..हा भ्रम आहे.
खरं पाहता आयुष्यातली सर्वात मोठी लढाई हीं आपल्या स्वतःच्या कमकुवतपणाशी, भीतीशी आणि आळशीपणाशी असते.
असहाय्यतेच्या वाळवंटात,आपणच स्वतःसाठी झऱ्यासारखे वाहायला शिकतो. आपल्या स्वप्नांचा, आपल्याच हातांनी बांधलेला पूल आपल्याला वादळातून बाहेर काढतो.
लोकांनी नाही तर स्वतःने आपल्याला परिभाषित करावं..
जगाचं एक नियम आहे – तुझ्या यशाआधी कोणीच तुला गंभीरपणे घेत नाही. तुझ्या अपयशाला तर सगळे हसतात.त्याचसाठी जर तू स्वतःच्या किमतीवर विश्वास ठेवायला शिकलास, तर बाकीचं जग नकळत तुला मानायला लागतं.
लोकांनी टाकलेली टीका, टोमणे आणि निरुत्साही शब्द हे सगळं वाऱ्यासारखं असतं. त्या वाऱ्याचा उपयोग तू पतंग उडवायला करू शकतोस, किंवा त्या वाऱ्याने उडून जाऊन कोसळू शकतोस –
निवड तुझी..!
आव्हानं – हीच खरी शाळा..
आयुष्याचा मार्ग गुळगुळीत नसतो. तो काट्यांनी, खाचखळग्यांनी भरलेला असतो. कधी अपयश पाय अडवतो, कधी परिस्थिती छातीवर दगड ठेवते...पण या सगळ्याच्या पलीकडे आव्हानांचं स्वागत करणं हेच मोठेपणाचं चिन्ह आहे.
सिंह कधीही सहज शिकार करत नाही,.तो धावताना स्वतःच्या ताकदीची कमाल गाठतो..तसंच, जो माणूस संयमाने लढायला शिकतो, त्याचं प्रत्येक पाऊल जिंकण्याकडे जातं.
स्वतःसाठी लढणं म्हणजे स्वार्थी होणं नाही..
काही लोकांना वाटतं, "स्वतःसाठी लढणं म्हणजे फक्त स्वतःपुरतं विचार करणं." पण खरा अर्थ यापेक्षा खूप मोठा आहे.
स्वतःसाठी लढणं म्हणजे –.आपल्या स्वप्नांसाठी धावणं,.आपल्या जबाबदाऱ्यांना निभावणं, आणि स्वतःला इतकं सक्षम करणं की नंतर आपण इतरांना हात द्यावा.
जो स्वतः उभा राहतो, तोच इतरांसाठी आधारस्तंभ होऊ शकतो.
धैर्य हीच खरी ताकद..
युद्ध जिंकायला तलवार लागत नाही, धैर्य लागतं. आणि हे धैर्य म्हणजे – अंधारातही आशेचा दिवा घेऊन चालण्याची ताकद.
कधी परिस्थिती अशी येते.की चारही बाजूने अंधार असतो.
त्यावेळी जो माणूस स्वतःसाठी उभा राहतो, त्याचं मन किल्ल्याप्रमाणे अभेद्य होतं. त्याच्या डोळ्यातील ज्योत इतरांसाठी मार्गदर्शक ठरते.
विजयाचं रहस्य – आत्मविश्वास
जगातली सर्वात मोठी जित...ही सोनं-चांदी मिळवणं नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवणं आहे.
"मी हे करू शकतो."
हा विचारच लढाईत तलवारीसारखा असतो. आणि ही तलवार तू जेव्हा हाती धरतोस, तेव्हा कोणतंही अडथळं पर्वतासारखं राहात नाही.
इतिहास साक्ष आहे...
इतिहासाची सुवर्णपाने पलटून पाहा...
सह्याद्रीच्या कडेकपारीतून सिंह गर्जला – छत्रपती शिवाजी महाराज..!
फक्त एका चादरीत, अहिंसेच्या अस्त्राने साम्राज्याला गुडघे
टेकवणारा महात्मा गांधी..!
आणि किनाऱ्यावरच्या छोट्याशा गावातून ज्ञानाच्या पंखांनी आकाश जिंकणारा – डॉ. अब्दुल कलाम!
त्यांच्याकडे सुरुवातीला कोणी साथ नव्हती, पण एक गोष्ट होती – स्वतःसाठी लढण्याची हिंमत...
हिंमत असेल तरच क्रांती घडते; बाकी फक्त तक्रारी केल्या जातात.
लढण्याची कला शिका..
मग आज स्वतःला एक प्रश्न विचारां..
तू कोणासाठी लढतोस? इतरांना खूश करण्यासाठी?
की स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी?
तू जर स्वतःच्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या प्रामाणिक मेहनतीसाठी लढायला लागलास, तर ही दुनिया तुला थांबवू शकत नाही.
पाण्याचा थेंब जेव्हा खडकाला छेदतो, तेव्हा तो बळाने नाही तर सातत्याने छेदतो. तसंच स्वतःसाठी लढणारा माणूस सातत्याने जिंकत राहतो.
आयुष्य आपल्याला नेहमीच एक निवड देते – किंवा हार मान, किंवा लढ.
लोक काय म्हणतील, परिस्थिती कशी आहे, याचा विचार करत बसलास तर जग तुला विसरून जाईल. पण एकदा तरी मनापासून स्वतःच्या अस्तित्वासाठी उभा राहून बघ, तुझं आयुष्यचं एक वेगळं रूप घेईल.
मग लक्षात ठेव..✍️
"स्वतःसाठी लढणारा माणूसच खरी दुनिया जिंकतो."
हे फक्त वाक्य नाही, ही एक जीवनशैली आहे,
एक युद्धघोष आहे, आणि खऱ्या अर्थाने जगण्याची कला आहे.
धन्यवाद मित्रांनो..!
लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा.
सकारात्मक विचार शेअर करणे हीच मानसिक आणि सामाजिक शक्ती वाढवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण प्रेरणादायक विचार इतरांसोबत वाटतो, तेव्हा ती ऊर्जा द्विगुणित होते आणि आपले जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. त्यामुळे, चांगल्या गोष्टी शेअर करत राहा आणि एकमेकांना पुढे जाण्यास प्रेरित करा मित्रांनो..!
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
https://www.vidhyarthimitra.com
Post a Comment